गणित देणारा
गणित देणाऱ्याने देत रहावे
सोडवणाऱ्याने सोडून पहावे
संख्या बाजारातूनी,
भले मोठे उदाहरने घ्यावी
नाजूक साजूक नाजूक साजूक
संख्यांशी गप्पा मारत खेळावे
गणित देणाऱ्याने देत रहावे
सोडवणाऱ्याने सोडून पहावे
राशी घात पाहूनी,
घात नियमांना वापरुनी
शूरवीरा सम, शूर वीरा सम
संख्यांचे विलोपन आनंदाने करावे
गणित देणाऱ्याने देत रहावे
सोडवणाऱ्याने सोडून पहावे
अंक पाड्यांची गीत गावी,
चित्त लावूनी सूत्र आठवावे
पायरी पायरीने हळू हळू
समीकरणात समानता गुणधर्मा न विसरावे
गणित देणाऱ्याने देत रहावे
सोडवणाऱ्याने सोडून पहावे
सोपे रूप देतच रहावे
खेळात या कधी न थांबावे
हरण्या अगोदर हरण्या अगोदर
तुमची चुक शोधण्या मागे वळूनी पहावे
गणित देणाऱ्याने देत रहावे
सोडवणाऱ्याने सोडून पहावे
सरावाने तर्का बांधावे
झटकन उत्तर तुमी सांगावे
लहान मोठ्यांनी लहान मोठ्यांनी
शंकाकुशंकाचे निरसन आनंदे करावे
गणित देणाऱ्याने देत रहावे